#OmicroneVariant #OmicronePatients #ThirdWave #MaharashtraTimes
महाराष्ट्र करोनाच्या ओमायक्रोन व्हेरियंटनं पुन्हा चिंता वाढवली आहे. एकाच दिवसात राज्यात ३१ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे.
आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या नव्या ३१ रुग्णांपैकी २७ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. ठाण्यात २ तर पुणे, अकोला इथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.