यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील काही भागात गारा पडल्या. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गारा पडल्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांवर बर्फ साचला होता. यवतमाळमध्ये हिवाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे रब्बी पिकांचं नुकसान झाले आहे.