#औरंगाबाद-जालना रोडवर शेकटा येथे अंगावर शहारे आणणारा अपघात घडला.हा अपघात CCTV कॅमेरात कैद झाला आहे.
दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला.एक दुचाकीस्वार आपल्या पत्नी आणि मुलासोबत जात असताना त्याने युटर्न घेतला.त्याचवेळी मागून येणाऱ्या कारची दुचाकीला जबर धडक बसली.मात्र अपघातानंतर कारचालकाने गाडी न थांबवता तिथून पळ काढला.या अपघातात दुचाकीवरील तिघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.