Pandharpur l नववर्षानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास फळा-फुलांची आकर्षक आरास l Vitthal Rakhumai
पंढरपूर (सोलापूर) : इंग्रजी नवीन वर्षारंभाच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध रंगांची तब्बल 1500 किलो फुले आणि 700 किलो फळे वापरून मनमोहक आरास करण्यात आली आहे. फुलांची आरास करण्यासाठी प्रदीप प्रकाश ठाकूर पाटील (आळंदी, पुणे) यांनी फुले उपलब्ध करून दिली. यासाठी गुलाब, जरबेरा, ब्लू डीजे, कामिनी, शेवंती, ऑर्केड, मिनीपाम, सॅंगोप, ड्रेसीना सायकस या वेगवेगळ्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय केळी, अननस, संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळिंब अशा विविध फळांची आणि पानांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली आहे.
(बातमीदार : अभय जोशी, पंढरपूर)
#PandharpurNewsUpdates #VitthalRakhumai #PandharpurMandir #NewYear2022 #PandharpurTempleDecorated #VitthalAarti #MarathiNews #MaharashtraNews #MaharashtrachDaivat #esakal #SakalMediaGroup