'भारतरत्न' लता मंगेशकर यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकाकुल आहे. सर्वच क्षेत्रांतून मान्यवर लतादीदींनी श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्याविषयी भावना व्यक्त करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लतादीदींनी आदरांजली वाहिली आहे. 'लतादीदी हे जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे,' अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. या दु:खद प्रसंगात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबीयांसोबत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.