नवाब मलिकाच्या अटकेनंतर महाविकास आघाडीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. आता अनिल देशमुखांपाठोपाठ नवाब मलिक यांच्याही राजीनाम्याची मागणी होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटालांनी मलिकांच्या राजीनाम्यासाठी दबाव बनवायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील एक मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी राजीनामा द्यावा लागला. ठाकरे सरकार मलिकांचा राजीनामा न घेता 93 बॉम्बस्फोटांचं समर्थन करणार का? मविआ सरकार एकप्रकारे दाऊदचे समर्थन करत आहेत त्यासाठी आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही आमचे आंदोलन आणखी तीव्र करु असा इशारा भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.