मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजेंनी उपोषण सोडावे. मागण्यांसाठी आग्रह जरूर धरावा, असे आवाहन पवार यांनी केले. ते रायगडमधील रोहा येथे बोलत होते.