मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे करत असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पांगरा ढोणे येथील तुकाराम ढोणे यांनी सुमारे ८० फूट उंचीच्या जलकुंभावर आमरण उपोषण सुरु केले आहे. महाराजांचे उपोषण जो पर्यंत सुटणार नाही, तोपर्यंत खाली न उतरण्याचा पावित्रा तुकाराम ढोणे यांनी घेतला आहे. दरम्यान त्यांना पाठिंबा देण्यासाठी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील शेकडो मराठा युवक पांगरा ढोणे येथे दाखल होत आहेत.