नुकतीच मी “हरीहरेश्वराला” जाऊन आले… (श्रीवर्धन जवळील)
(आणि खरचच प्रार्थना पुर्ण होतायेत अस वाटतय.)
हरीहरेश्वर - हरी (विष्णू) , हर (शिव), ईश्वर (ब्रम्हा) अशी ३ स्वयंभू लिंग आहेत.... मुळात हे मंदिर ३ डोंगरांच्या मध्ये वसलय त्यामुळे त्याच हे नाव असावं अस मला वाटत....
तसं तर; शिव हे तत्व (energy) आहे असच आम्ही मानतो. आणि ध्यानामार्गे त्या तत्वाच्या जवळ जाऊ पाहतो. तर आज उपास आणि महादेव दर्शनाव्यतिरिक्त ध्यान जरूर करा.
#ॐनम:शिवाय