महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. पुण्यात अनेक शाळांमध्ये मुलांचं औक्षण करून फुलं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं
परीक्षेच्या कारणास्तव विद्यार्थ्यांना एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थितीत राहणं अनिवार्य आहे. कोरोना पार्श्वभूमीवर परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या मात्र निर्बंध शिथिल केल्यामुळे सर्व परीक्षा आता ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे सरकार ने स्पष्ट केले होते.
बारावी परीक्षेसाठी राज्यातील १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी बसणार आहेत तर राज्यातील सुमारे नऊ हजार ६३५ परीक्षा केंद्र आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके,विशेष महिला पथकांची स्थापना करण्यात आलीय. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत परिक्षा होईल.
#HSCExams #12thBoardExams #HSC #Boards #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup