५ राज्यातील ४ राज्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालंय. त्यात गोव्याची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) होती. त्यात फडणवीसांनी आखलेल्या व्ह्यूहरचनेमुळे भाजपला गोव्यात ४० पैकी २० जागा मिळाल्यात तर, तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर आज मुंबईत भाजपकडून फडणवीसांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी शिवसेनेची स्पर्धा NOTA शी असल्याचं म्हणत टोला लगावला आणि आता लक्ष्य मुंबई महापालिका असल्याचं सांगून कार्यकर्त्यांना आज जल्लोष करा, उद्यापासून कामाला लागा, असं आवाहन केलं.
#DevendraFadnavis #AssemblyElectionResults2022 #punjabassemblyelectionresults #UPassemblyelectionresults #manipurassemblyelectionresults #AssemblyelectionresultUP #MaharashtraPoliticalNewsUpdates #bjp #ThackeraySarkar #UddhavThackeray #Congress