या आईची प्रार्थना देवानं ऐकलीये.... जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जयंत प्रल्हाद कारेमोरेनं MPSC परिक्षेत घवघवीत यश मिळवलंय आणि आई वडिलांनी शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाचं चीज मुलानं केलंय. मोहाडी तालुक्यातील नेरी या गावातील जयंत कारेमोरे यांनी MPSC मध्ये यश मिळवत RTO इंस्पेक्टर पदी नियुक्ति मिळवली आहे.राज्य आयोगाच्या असिस्टेट मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर पदाकरिता राज्यातील दीड लाख युवकांनी प्रीलिमरी परीक्षा दिली. पाच हजार युवकांची निवड मुख्य परीक्षेकरिता निवड झाली. पाच हजार युवकांची निवड मुख्य परीक्षेकरिता निवड झाली. यात जयंत याने राज्यातून 24 वी रँक मिळविली, पण हे यश मिळवणं तितकंस सोप नव्हत. जयंतला आई वडिलांचा मोठा आधार आहे. पैसे अपुरे पडत असल्याने जयंतने घरीच अभ्यास केला व संघर्षमय जीवनातून यश प्राप्त केला. हा संघर्ष जवळून पाहिलेल्या जयंतच्या वडिलांच्या डोळ्यांत आज त्याचं हे यश पाहून आनंदाश्रू तरळले. जिद्दीला प्रयत्नांची जोड आणि कुटुंबीयांची साथ असली की माणूस आपले ध्येय नक्कीच गाठतो हे या शेतकरी पुत्रानं सिध्द करून दाखवले आहे