महाविकास आघाडी अडचणीत; २५ आमदारांनी ठाकरे सरकारची धाकधूक वाढवली

TimesInternet 2022-03-30

Views 0

शिवसेना नेते आपल्याला स्वतःचं सरकार असून निधी मिळत नसल्याची नाराजी बोलून दाखवतात, सत्तेत सोबत असूनही राष्ट्रवादी शिवसेनेचेच नेते फोडताना दिसते, तर आता काँग्रेसही याला अपवाद नाही. काँग्रेसचे २५ आमदार सरकारवर नाराज असल्याची माहितीय. ठाकरे सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या काँग्रेसच्या २५ आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त करत थेट सोनिया गांधींनाच पत्र लिहिलंय. काँग्रेसची ही नाराजी कायम राहिली तर थेट ठाकरे सरकारच अडचणीत येऊ शकतं. कारण, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना बहुमत कायम ठेवण्यासाठी काँग्रेसचीही तेवढीच गरज आहे. ठाकरे सरकारमध्ये नाराजी का उफाळून आलीय, यात भाजपची काही भूमिका आहे का आणि काँग्रेसमधील दुफळी ठाकरेंना अडचणीत आणणार का सविस्तर समजून घेऊ या व्हिडीओतून...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS