गेल्या दोन वर्षापासून शिर्डीत कोरोनामुळे कोणतेही सण उत्सव मोकळेपणाने साजरे करता येत नव्हते. यावर्षी मात्र राज्यातील सर्व निर्बंध हटवल्याने शिर्डीतील रामनवमी उत्सव ९, १० आणि ११ एप्रिल या कालावधीत मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय.. शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून साईबाबांची विश्वविक्रमी रांगोळी हे या वर्षीच्या रामनवमीचे आकर्षण असणार आहे.. या रांगोळी बाबत साईभक्तांना उत्सुकता लागली असून ज्या ठिकाणी रांगोळी काढली जातेय तेथून आढावा घेतलाय सचिन बनसोडे यांनी...