मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A'या मार्गाचे लोकापर्ण करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधताना राज्य सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले. ते म्हणाले, राजकारणात एक नवीन साथ आली आहे. या व्हायरसची लक्षणे दिसत नाही. या व्हायरसची लागण झाल्यानंतर आरोप सुरू होतात. एकतर इतरांनी केलं नाही, जे केलं ते आम्हीच केलं आणि इतरांनी नवीन केलं तर त्यात भ्रष्टाचार झाल्याची बोंब मारत असल्याचे दिसते. राज्य सरकारची अडवणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आम्ही तुमच्यासारखी आडमुठी भूमिका घेत नाही. संघर्ष करण्याची वेळ आमच्यावर आणू नका. असंही ते यावेळी म्हणाले.