शेतीसाठी 5 कोटी लीटरची पाण्याची बँक; अरुण देशपांडे यांची संकल्पना

Maharashtra Times 2022-04-03

Views 72

सोलापूरमधल्या अंकोली गावात 2004 साली 22 शेतकरी एकत्र आले. अन् 5 कोटी लीटर असलेली वॉटर बँक सुरू केली. पावसाळ्यात यात पाणी डिपॉझिट केलं जातं. तर उन्हाळ्यात हेच पाणी शेतासाठी वापरलं जातं. 5 कोटी लीटर क्षमता असलेल्या या टाकीत 3 कोटी लीटर पाणी भरलं जातं. जलतज्ज्ञ अरुण देशपांडे यांनी ही मोहीम राबवली आहे. इतर क्षेत्रांप्रमाणे शेतीलाही अपग्रेड होण्याची गरज आहे. आणि त्यासाठी शहर आणि गाव एकत्र येणं गरजेचं आहे. अरुण देशपांडे यांनी यासाठी रुरबन ही संकल्पना काढली. यात सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असून पर्यावरण पुरक असं मॉडेल घर त्यांनी तयार केलंय. आभासी विकासावर बोलताना देशपांडे यांनी लोकल ते ग्लोबल मॉडेलचा मानवी प्रवास सोप्पा करुन दाखवलाय. शेतकऱ्यांनी गटशेती करुन सामुहिक पद्धतीने साकारलेली वॉटरबँक ही महिला शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावी, यासाठीही देशपांडे प्रयत्न करत आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी वॉटर बँकेसारखे पर्याय सुचवलेत. अरुण देशपांडेचा हा प्रयोग महाराष्ट्राला अनुकरणीय ठरणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS