लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचं पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन झालं. यावेळी धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जोरदार कौतुक केलं. हे काम फक्त अजित पवारांमुळे पूर्ण झालंय, असं धनंजय मुंडे म्हणाले. भाषण करताना आणि कामगारांविषयी बोलताना ते गहिवरल्याचंही दिसून आलं. याच भाषणात त्यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केली.