खासदार डॉ. सुजय विखे काही दिवसांपासून वेगवेगळ्या वक्तव्यावरून चर्चेत आहेत. त्यांच्या आणखी एका वक्तव्याने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ते म्हणाले, ज्या पक्षासाठी मोदींच्या विरोधात मी पाथर्डीत रॅली केल्या... त्यांच्याविरोधात भाषण केले तो पक्ष आम्हाला न्याय देऊ शकला का? नाही देऊ शकला म्हणून आम्ही पलटी मारली. जिथे न्याय मिळेल तिथे आम्ही आहोत. आमच्यावर अन्याय करा, आम्ही एक मिनिटात पलटी मारू असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चा सुरू झाल्यात.ते श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे एका कार्यक्रमात बोलत होते.