महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर सर्वांकडूनच टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही ठाकरे यांच्या भाषणाचा समाचार घेतला. "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्राचे फायरब्रँड नेते आहेत. मात्र ईडीच्या नोटीसीने फायरब्रँड असणारे राज ठाकरे हे फ्लॉवर का झाले? भाजपकडून जी ईडीची सूडबुद्धीने कारवाई केली, तिथे कुठेतरी फायरब्रँड नेत्याचं फ्लॉवर झालं आहे." अशी टीका करत रुपाली ठोंबरे पाटलांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.