तू तेव्हा तशी प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. मालिकेसोबतच मालिकेच्या शीर्षक गीताची देखील चर्चा आहे. हे गीत रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर रुळतंय. हे शीर्षक गीत संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. या शीर्षक गीताचे शब्द अभिषेक खणकर यांचे असून अभय जोधपूरकरने ते गायलं आहे. हे शीर्षकगीत यशस्वी होण्यामागे पडद्यामागील सर्व तत्रंज्ञाचादेखील तितकाच महत्वपूर्ण वाटा असल्याचं समीर सप्तीसकर यांनी आवर्जून सांगितलं.