महाबळेश्वर : श्रीक्षेत्र महाबळेश्वर परिसरात असलेल्या एका खासगी बंगल्याच्या अंदाजे वीस फूट खोल कोरड्या विहिरीत रानगवा पडला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनी कोरड्या विहिरीत हा रानगवा पडल्याचे पाहिले व त्यांनी ही माहिती वनविभागास कळवली. वनविभागाचे वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह वनविभागाची टीम, तसेच महाबळेश्वर ट्रेकर्स,प्रतापगड रेस्क्यू टीम व क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पुण्यातील तज्ज्ञांची रेस्क्यू टीम बोलाविली ही टीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाली. या रेस्क्यू टीमच्या डॉक्टरांनी या रानगव्यास भुलीचे इंजेक्शन दिले. तद्नंतर रेस्क्यू टीम पुणे,महाबळेश्वर व प्रतापगड टीमच्या जवानांच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर क्रेनच्या साहाय्याने या रानगव्यास सुखरूपपणे विहिरीबाहेर काढण्यात यश आले.
व्हिडिओ : अभिजीत खुरासणे
#Sakal #Mahabaleshwar #Satara #RangawaAnimal #SakalNews #BreakingNewsToday #Maharashtra #ViralVideo