ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी 'आयेगा आनेवाला' हे सदाबहार गीत गात दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. 24 एप्रिल रोजी मुंबईत पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, आशा भोसले यांच्यासह मंगेशकर कुटुंबीयांनी लतादीदींनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी देशसेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
#latamangeshkar #ashabhosle #songs