खासदार गिरीश बापट यांचं २९ मार्च रोजी निधन झालं. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजपाचे नेते मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे, भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आदींनी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी दिल्लीतील आपल्या खासदारकीचा एक किस्सा सांगितला. तसंच गिरीश बापट साहेब हे विधिमंडळाच्या कामकाजावेळी बाकरवडी घेऊन यायचे, याबद्दलही अजित पवारांनी आठवण सांगितली
रिपोर्टर - सागर कासार