राज्यात भोंगा आणि हनुमान चालिसावरुन राजकारण सुरू आहे. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांविषयी सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही. लवकरात लवकर राजकीय नेतेमंडळींनी धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करणारं राजकारण बंद करावं. शिवाय, गुणरत्न सदावर्तेंची सनद रद्द करण्याची मागणीही मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आली आहे. सरकार आणि विरोधकांनी आपल्या मागण्यांचा विचार केला नाही तर ६ मे रोजी ठाण्यात बैठक घेऊन आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करु, असा इशाराही देण्यात आलाय.
(रमेश करे पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चा, महाराष्ट्र राज्य)
#rameshkare, #marathamorcha, #ekmarathalakhmaratha, #politians, #rajthackeray, #bhonga, #sadavarte, #sadavartenews,