पुणे : सरकारविरोधात कट करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एनआयए अंतर्गत अटक झाली पाहिजे, अशी मागणी वंचित विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकार पाडण्याचा कट करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #AjitPawar #UddhavThackeray