'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाच्या निमित्ताने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'वर आलेले अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आपण एका जॉनरचा एकच चित्रपट करतो असं सांगितलं आहे. त्यामुळे आपण पुन्हा ऐतिहासिक चित्रपट करणार नसल्याचं ते सांगतात. मात्र जॉनर संपतील तेव्हा भविष्यात काय करणार याचा प्लॅनही त्यांनी या मुलाखतीत सांगितला...