नाशिक जिल्हयाच्या ग्रामीण भागात सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून वन्यप्राणी पाण्याच्या शोधात नागरी वस्त्यांमध्ये धाव घेतायत. जिल्ह्यातील येवला तालुक्यात हरीण आणि काळवीट यांच्यासह मोरांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असून रेंडाळेचे शेतकरी प्रवीण आहेर यांनी या वन्यप्राण्यांसाठी आपल्या शेतात सिमेंटची टाकी तयार करून या वन्यप्राण्यांच्या पाण्याची सोय केलीय. त्यामुळे त्यांच्या शेतात सकाळी आणि संध्याकाळी मोर, लांडोर अगदी बिनधास्त आपली तहान भागवण्यासाठी पाणी पिण्यासाठी येतात. यावेळी मोर पिसारा फुलवून मनसोक्त नाचताना पाहायला मिळतात.