सर्व वाद्यांची वेगळी ओळख आहे. पण काही वाद्यांचं नाव घेतलं की वादक हे पुरुषच असतील, असा विचार मनात येतो. ढोलकी हे त्यापैकीच एक. परंतु मुंबईतील प्रेषिता मोरे नावाची तरुणी उत्तमरित्या ढोलकी वाजवते. अनेक कार्यक्रमांमध्ये तिने उपस्थिती लावली आहे. जाणून घेऊयात प्रेषिता मोरेच्या प्रवासाबद्दल...