बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया आणि डीएचएफएलचे प्रमोटर कपिल वाधवान यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. दीडशे कोटींच्या फसवणूकप्रकरणी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. मुंबईत महालक्ष्मी इथल्या पुनर्विकास योजना प्रकरणी या गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही पुनर्विकास योजना अजूनही पूर्ण झालेली नाही. येस बँक-राणा कपूर प्रकरणी सीबीआयने एप्रिलमध्ये छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती..