महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून सर्व विभागातून कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक ९९.२७ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी ९५.९० टक्के निकाल नाशिक विभागाचा लागला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
#SSC #board #results #maharashtra