महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजतै ऑनलाइन जाहीर झाला. पुण्यातील भवानी पेठेत राहणारा आणि रमणबाग शाळेतील विद्यार्थी शुभम राहुल जाधव याला दहावीत सर्व विषयांमध्ये ३५ टक्के गुण मिळाले आहेत. या सर्व गुणांची टक्केवारी ३५ टक्के इतकी आहे. या विद्यार्थ्याचे गुण सोशल मीडियावर व्हायरल होताच, तेथील नागरिकांनी पुणेरी पगडी आणि पेढे देऊन शुभमचे अभिनंदन केले.
#maharashtra #SSC #results #35persentage