Election : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं...राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे.. विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. कैद्यांना मतदानाचा अधिकार नाहीत, ईडीचा हा युक्तिवाद हायकोर्टाने स्वीकारला.