आम्ही चमत्कारासाठी नव्हे तर विजयसाठी निवडणूक लढवत आहोत... विचारपूर्वकच राज्यसभेत तीन उमेदवार दिले होते आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीतही आम्ही चमत्कारासाठी नव्हे तर विजयासाठी पाचवा उमेदवार उभा केल्याचे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.. विधानपरिषद निवडणुकीची आम्ही अतिशय नियोजनपूर्वक तयारी केली आहे.. आमदारांच्या सद्सद्विवेकबुद्धी वर आमचा विश्वास असून आम्ही विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला... २४ ऑक्टोबर २०१९ रोजी आमच्याशी धोका झाला होता... मतदारांशी गद्दारी करण्यात आली होती..