"२०१४ सालापासून हॉटेलचं बील थकवल्याचा आरोप करून एका हॉटेल मालकाने १७ जून रोजी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला होता. त्यानंतर या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. या हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांनी माझ्या हॉटेलचे ६६ हजार रुपये थकवल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आता सदाभाऊ खोत यांनी हा राष्ट्रवादीचा प्लॅन होता, असा आरोप केला आहे.
#SharadPawar #SadabhauKhot #RayatKrantiSanghatana #NCP #BJP #JayantPatil #ViralVideo #Solapur #Maharashtra #HWNews