गुलाबराव पाटील म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते शिवसेनेची बाजू हिरीरीने आणि तितक्याच आक्रमकपणे मांडणारा शिवसैनिक. शिवसेनेवरचे सगळे वार स्वतःच्या छातीवर झेलण्याइतका निष्ठावान सैनिक अशी गुलाबरावांची ख्याती... पण हेच गुलाबराव आता उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी झालेयत...