आमदार रवी राणा ( Ravi Rana ) आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या वादात आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी उडी घेतली आहे. "आमदार रवी राणा यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखं आहे. कोणी विकावू नाहीय, तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. त्यामुळे रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे, असे खडे बोल गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना सुनावत बच्चू कडू यांची बाजू घेतली आहे.
#RaviRana #BacchuKadu #GulabraoPatil #ShivSena #EknathShinde #DevendraFadnavis #AdityaThackeray #AshishShelar #KishoriPednekar #Gujarat #UdaySamant