एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना हाताशी धरुन गुरुवारी सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नवीन मुख्यमंत्री हे शिवसैनिक नसल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'अडीच वर्षांपूर्वी अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर भाजपला अडीच वर्ष सत्ता मिळाली असती. पण त्यांने तसे काही केले नाही. पण शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्यांना त्यांना का मुख्यमंत्री केले? हा प्रश्न माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे.'