सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेत संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारणारा अभिनेता वरुण भागवत हा इन्स्टाग्रामवर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. वरुणने आषाढी एकादशीच्या निमित्ताने नुकतीच एक पोस्ट शेयर केली आहे. यात त्याने विठ्ठलाच्या कपाळी असणाऱ्या टिळ्याचे आणि रस्ता दाखवणऱ्या गुगल मॅप्सचं आगळंवेगळं नातं सांगितलं आहे. त्याच्या पोस्ट वर टाकूया एक नजर...