मुंबईतील आरे जंगल वाचवण्यासाठी तरुण आंदोलन करत आहेत. आरेमध्ये राहणाऱ्या काही तरुणांनी आरे जनजागृतीसाठी एक अनोखी शक्कल लढविली आहे. सुमित यडेकर आणि त्याचे मित्र मेट्रो १ मध्ये गाणे गाऊन जनजागृती करत आहेत. या तरुणांनी रविवारी आरे आंदोलनादरम्यानच्या प्रवासात "आरेची काळजी रे, आम्हाला आरेची काळजी रे" असे शब्द असलेले गाणे गायले.