कोकणातील अतिमुसळधार पावसामुळे आठवड्यापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली आणि घाटातील वाहतूक बंद झाली..छोट्या वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली तर मागील पूर्ण आठवडा अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.. याच्याच निषेधार्थ ट्रक चालकांनी आज चक्का जाम केलं होतं.