शिंदे गट आणि भाजपाने राज्यात सरकार स्थापन केले आणि ४० दिवसांनंतर राज्यमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. राजभवनावरील शपथविधी सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकाही महिला मंत्र्याचा समावेश नाही. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नाराजी व्यक्त केलीय.
#SupriyaSule #MantriMandal #maharashtra