मानखूर्दमध्ये शिंदे गटाच्या पहिल्या शाखेचं उद्धाटन। Rahul Shewale| Eknath Shinde| Mankhurd| Shivsena

HW News Marathi 2022-08-13

Views 27

शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्यानंतर आता शिंदे गटाने (Eknath Shinde Group ) भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिंदे गट आपली शाखा सुरू करणार आहे. आज सकाळी मुंबईत शिंदे गटाची पहिली शाखा स्थापन (Shinde Group Shivsena Branch in Mumbai) होणार आहे. शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्या मतदारसंघातील मानखुर्दमध्ये ही शाखा सुरू होणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटानेही तयारी सुरू केली असल्याचे हे चिन्हं असल्याचे म्हटले जात आहे. आज सकाळी 11.30 वाजता शिंदे गटाच्या शाखेचे उद्घाटन होणार आहे.

शिंदे गटाकडून शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचे सांगत शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय असावे असा तर्क यासाठी शिंदे गटाकडून देण्यात आला. त्यानंतर आता शिंदे गटाकडून शाखा सुरू करण्यात येत आहेत. शनिवारी, 13 ऑगस्ट रोजी मानखुर्दमध्ये बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून मुंबईत शिंदे गटाची पहिली शाखा सुरू करण्यात येत आहे.

#RahulShewale #EknathShinde #Mankhurd #ShivSena #BJP #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS