स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इस्लामपुरातील बस आगारात आज उत्साहपूर्ण वातावरण आहे. आगारातील एसटी गाड्याही दिमाखात सजल्या आहेत. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या या लालपरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सारथ्य केले.