राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत चुकीचा शब्द वापरल्याने एकच गदारोळ पाहायला मिळाला. जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून 'निर्लज्जपणा बंद करा' असे विधान केले.या प्रकरणी जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, 'अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांना बोलू न देणं हे सुरू आहे. भास्कर जाधव यांना बोलण्यासाठी संधी देण्यात येत नव्हती पण मग त्यानंतर 'मी निर्लज्जपणासारखं वागू नका' असं म्हणालो पण नंतर निलंबनाचा ठराव मांडला गेला'