शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत त्यांनी वर्षा निवासस्थान सोडले होते. शिंदे-फडणवीस सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस झाला. आजचा दिवसही वादळी ठरला. शिवसेनेच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होत आहे. आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीसाठी दाखल झाले आहेत.
#UddhavThackeray #ShivSena #VidhanBhavan #Maharashtra #MonsoonSession #HWNews