एनसीबीचे मुंबईचे माजी विभागीय आयुक्त समीर वानखडे हे मुस्लीम असून त्यांनी खोटं जात प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळविल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला होता आणि त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यावरून राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापलं होतं. पण आता मात्र समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीकडून दिलासा मिळाला आहे. आणि आता या प्रकरणातून निर्दोषमुक्त झाल्यानंतर समीर वानखडे यांनी वाशीमच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आपल्या भावाकडून दिलेल्या तक्रारीवरून अट्रॉसिटीनुसार नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा असं प्रतिज्ञापत्र आज सादर केलंय.
#SameerWankhede #NawabMalik #AryanKhan #SharadPawar #NCP #NCB #Jail #Washim #Maharashtra #BJP #MVA #MahavikasAghadi #HWNews