शिंदे गटाकडून शिवसेनेचा 'दसरा मेळावा' हायजॅक करण्याच्या तयारी सुरू झाल्याची माहिती मिळतेय.. उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झालीये. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र हात आखडता घेतल्याचे समजते.