२०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा सेनेची युती तुटली आणि नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली होती. पण शिंदे गटाच्या बंडानंतर आघाडी सरकार पायउतार झालं. आता आगामी निवडणुकीत पुन्हा आघाडी स्थापन होणार का, याबाबत अजित पवारांनी भाष्य केलंय.