गणेशोत्सव काळातील भेटींबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी भुमिका स्पष्ट केली आहे. "यााधीही गणेशोत्सव काळात फिरत होतो आणि आता मुख्यमंत्री झाल्यावर गेलो नसतो तर लोकं म्हणाली असती की कलापर्यंत बरा होता, आता अचानक बदलला" असं सांगत गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना दिलेल्या भेटीच्या कार्यक्रमाचे समर्थन मुख्यमंत्री यांनी केले. आपल्यामुळे अजित पवारांसह अनेकांना फिरावं लागल्याचं मिश्किलपणे त्यांनी सांगितलं.