५ ऑक्टोबरला शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होणार आहेत. ठाकरे गटाचा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा बीकेसीतील मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. या दोन्ही दसरा मेळाव्यानिमित्त होणाऱ्या सभांमध्ये दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन होणार हे नक्की. त्यातच आज मातोश्रीबाहेरील राष्ट्रवादीच्या बॅनरची चर्चा होतेय.